🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : के.के. रेंजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी मी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असेल तर त्यात माझं काही चुकतय असं मला वाटतं नाही. पारनेर तालुक्यात मागील दोन आठवड्यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोव्हिड सेंटरचे उद्घाटन केले होते, त्यावेळी कुठे गेला होता सोशल डिस्टंसिंग ? असा सवाल करत कर्जत-जामखेडमध्ये रोजच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. तेथे रोज वेगवेगळे उद्घाटने सुरू आहेत. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वेगळा निकष आहे. मला जाणीवपूर्वक ‘टार्गेट’ करण्याचा हा प्रयत्न असून माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्या सत्ताधारी आमदारांसह आरोग्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करावा असे मत खासदार डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त करीत त्यांनी आमदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार सुजय विखे पाटील यांनी के.के.रेंज जमीन अधिग्रहणप्रकरणी विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे. त्या अनुषंगाने विखे यांनी शेतकऱ्यांची पहिली बैठक पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे घेतली. मात्र, या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले होते. या बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर विखे यांच्यावर टीका सुरू झाली होती.
मात्र या टीकेला उत्तर देताना खा.सुजय विखे यांनी आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील त्या सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. डॉ.विखे हे काल जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दिलासादायक: राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा ५ लाखांपार
मराठा आरक्षण : आरक्षणाचा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे जाणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
