Share

दिलासादायक: राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा ५ लाखांपार

Published On: 

मुंबई : गेले ५ महिने राज्यात कोरोनाने कहर माजवला आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून अजून देखील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये दिलासादायक माहिती आता समोर येत आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाखांवर गेली असून राज्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण हे ७३.१४ टक्के इतके झाले आहे.

काल (दि. २५ ऑगस्ट) रोजी दिवसभरात १० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, १२ हजार ३०० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आता, राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा ५ लाख १४ हजार ७९० वर गेला आहे. तसेच, दिवसभरात ३२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.राज्यात सद्या १ लाख ६५ हजार ९२१ ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

माझ्या एकट्यावरच नाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा ; खासदार सुजय विखे पाटील आक्रमक

आता पर्यंत राज्यात एकूण ७ लाख ३ हजार ८२३ कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकूण २२ हजार ७९४ रुग्णांनी आपला प्राण गमवाल्याची माहिती,राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सद्या राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत तर, ३३ हजार ६६८ नागरिक हे संस्थात्मक क्वारंटाईन केले गेले आहेत.

..तर, येत्या काळात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल : खा. सुजय विखे पाटील

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!