Share

पिंपरी-चिंचवडमध्ये विसर्जनासाठी फिरत्या हौदाची सोय करा; महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : यंदाच्या वर्षी देशभरातील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.

पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हजारो मंडळे, घरगुती मूर्तींची स्थापना केली जाते. यावर्षी मात्र, विसर्जनाचा मोठा प्रश्न भविकांसमोर उभा राहिला आहे. महानगरपालिकेने सर्व विसर्जन घाट सील केले असून नागरिकांनी घरीच मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र, अनेक नागरिक स्वतःची सोय करण्यास असक्षम असून मोठ्या प्रमाणात स्थापन करण्यात आलेल्या पीओपीच्या मूर्ती देखील कुठे विसर्जन करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

‘परत या परत या, राहुल गांधी परत या’ ; भाजपा नेत्यांची उपरोधिक टीका

त्यामुळे, पिंपरी-चिंचवड मनपाचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी प्रभाग स्तरावर फिरत्या हौदांची सोय करण्याबाबत मागणी केली आहे. गणेश स्थापना झाल्यानंतर महापालिकेतर्फे घरीच विसर्जन करण्याच्या सुचना देण्यात आल्याने नागरिकांमध्ये आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आवाहन आधी केले असते तर किमान शाडूच्या मूर्ती घेण्यावरच नागरिकांनी भर दिला असता. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विघळत नाहीत, त्यामुळे मुर्तींची विटंबना होईल व नागरीकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा नुमना पुन्हा एकदा समोर आलेला आहे.

शिवसेनेच्या ‘या’ ढाण्या वाघाला कोरोनाचा घेराव

“पुढील पाचव्या, सातव्या, नवव्या व अनंत चर्तुथी या विसर्जना दिवशी शहरातील भक्तांच्या भावनांशी न खेळता गणेश विसर्जनांसाठी पुणे मनपाच्या धर्तीवर फिरत्या हौदाची संकल्पना प्रभाग स्तरावर  राबविण्यात यावी. तसेच मुर्ती विरघळण्यासाठी आवश्यक असणारी पावडरसुध्दा उपलब्ध करुन द्यावी.  त्याच प्रमाणे शहरातील सामाजिक संस्था गणेश मुर्तीचे दान स्वीकारतात त्यांना सुध्दा गणेश मुर्ती दान करण्यास परवानगी देण्यात यावी” अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

मोठी बातमी : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!