Share

धोनीसाठी फेरवेल सामना आयोजित करा; झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची बीसीसीआयकडे विनंती

Published On: 

🕒 1 min read

रांची : भारतीय क्रीडा विश्वाचा जणू काही अघोषित सम्राट ठरलेला क्रीडा रसिक आणि चाहत्यांचा “कॅप्टन कूल” अर्थात महेंद्रसिंग धोनी याने शनिवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती होत असल्याचं जाहीर केलं. मात्र काल धोनीने अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे त्याच्‍या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून धोनीने “मैं पल दो पल की हस्ती हूं।” या गाण्यासह एक व्हिडिओ शेअर करत निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनीचे चाहते अधिकच भावुक झाल्याचे दिसून आलं. त्यानंतर समाज माध्यमांमध्ये धोनीच्‍या निवृत्ती बद्दल अनेक प्रतिक्रिया आल्याचं दिसून आले. तसेच त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे आधीच भावुक झालेले त्याचे चाहते, क्रीडाप्रेमी हे त्याने कुठल्याही फेअरवेल प्रोग्राम विना त्याने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे नाराज झाल्याचं देखील दिसून आलं.

“झारखंडचा सुपुत्र असलेल्या महेंद्रसिंग धोनीने राज्याला उत्साह आणि अभिमान वाटणारे अनेक क्षण दिले. त्या धोनीला आता निळी जर्सी घातलेलं बघता येणार नाही. तसेच देशवासीयांना धोनीला आणखी खेळताना बघायची इच्छा आहे. त्यामुळे संपूर्ण जग बघेल अशी रांची येथे धोनीची एक फेयरवेल मॅच आयोजित करण्यात यावी अशी विनंती बीसीसीआयकडे करत असल्याचे ट्विट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलं.” धोनीचा हा फेअरवेल सामना पाहण्यासाठी त्याचे चाहते डोळे लावून बसले आहेत. तर हा सामना कधी भरवला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने बीसीसीआयकडे केली ‘ही’ मोठी मागणी

२०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी; भाजप खासदाराचा धोनीला सल्ला

रशियाने सुरु केलं लसीचं उत्पादन; ५० कोटी डोस तयार करणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!