Share

धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने बीसीसीआयकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने निवृत्ती घेऊन तासभरही झाला नाही त्यातच मित्र सुरेश रैनाने देखील आपली निवृत्ती जाहीर केलीये.

महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 पासून मला निवृत्त समजले जावे”, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या पोस्टसोबतच धोनीने एक व्हिडीओही शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये दिसणार आहे. 39 वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला.

भारतीय संघातील यष्टीरक्षक आणि धोनीचा साथीदार दिनेश कार्तिकनेही धोनीसोबतचा एक फोटो ट्विटर वरुन शेअर करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्याने धोनीच्या चांगल्या आठवणी नेहमी माझ्यासोबत राहिल असं म्हंटल आहे. त्याच बरोबर बीसीसीआय धोनीची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करेल अशी कार्तिकने आशा केली आहे.

महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही- अजित पवार

‘धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल असा विश्वास होता’

पुणेरी पत्रकाराच्या खोचक प्रश्नाने ट्रम्पनाही केलं निरुत्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!