Share

खुशखबर! पुणेकरांची पीएमपीएमएल बससेवा होणार पूर्ववत; लवकरच सेवेत होणार रुजू

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेले ५ महिने कोरोना महामारीने जगभरासह देशात देखील थैमान घातले आहे. तर, राज्यात शिरकाव केल्यापासून मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यात देखील कोरोनाने कहर घातल्यामुळे प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. आता, हळूहळू सर्व स्थिती हि सर्वसामान्य होत असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांसाठी बंद करण्यात आलेल्या पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी हि खुशखबर असून बससेवा पूढील आठवड्यापासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनी बससेवा सुरु होणार आहे. दरम्यान, २२ तारखेला गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून दोन्ही शहरांमध्ये होणाऱ्या बससेवेचा श्री गणेशा करण्यात येण्याशी शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय झाल्यास, शहरातील अनेक भागातील कामासाठी दळणवळण करण्याऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल.

शिवसेने नंतर राष्ट्रवादीने फोडला कॉंग्रेस पक्ष ‘हा’ बडा नेता करणार प्रवेश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये बससेवा सुरु करण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. आता, त्यांनी तत्वतः मान्यता दिली असून येत्या २२ तारखेला सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, अजूनही प्रशासनाने अधिकृत तारीख जरी जाहीर केली नसली तरी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर हि सेवा सुरु केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदरच करतो, अविनाश जाधव यांचं शिवसेना खासदार-आमदाराला प्रत्युत्तर

तर, गेले ५ महिने पीएमपीएमएलला मोठा आर्थिक फटका बसला असून येत्या काळात नागरिकांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात सेवा सुरु केली जाईल. यात महत्वाचे म्हणजे दोन्ही शहरातील लाखो प्रवासी बससेवेने प्रवास करतात त्यामुळे, अजूनही असलेला कोरोनाचा धोका बघता सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जाणार असून दिवसातून २ ते ३ वेळा बसचे निर्जंतुकीकरण केले जाईल.

संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे डॉक्टरांचा अपमान – भाजप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!