🕒 1 min read
ठाणे : मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना काही दिवसांपूर्वी एका आंदोलनाप्रकरणी तडीपारीची नोटीस बजावत अटक करण्यात आली होती. तर, ७ ऑगस्ट रोजी ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर, प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना देखील आम्ही घरातून उचलून नेऊ असे विधान केले होते. त्यामुळे जाधव यांच्या अटकेने मनसे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने आले आहेत. तर, हा वाद अजून देखील मिटला नसून आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अविनाश जाधव यांच्या या विधानावरून शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मनसेला थेट आव्हान दिले आहे. आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी असलो तरी आमचं कायमच एक पद आहे ते म्हणजे शिवसैनिक, त्यामुळे आमच्या नादी लागू नका, अस खासदार राजन विचारे म्हणाले होते. यावर आता अविनाश जाधव यांनी यासंबंधी काल एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नांतून प्रत्युत्तर दिल्याची व्हिडिओ समोर येत आहे.
कोरोनाच्या काळात आंदोलनं करताना लाज वाटायला पाहिजे – हसन मुश्रीफ
“मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो, कोणत्या शिवसैनिकाला उचलणं हा माझा धंदा नाही. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या मुशीतले आहोत, आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड नितांत आदर आहे. मी म्हटलं होतं जे आम्हाला त्रास देतात ते..तुम्ही आम्हाला त्रास देतायेत का असा अर्थ होतो. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले?”असा सवाल देखील मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
आज देशात मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे का ? – सोनिया गांधी
दरम्यान, ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आम्ही उचलून नेऊ, बाकी अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे राजसाहेबांचा देखील आदर करतात अशा शिवसैनिकांबद्दल मला देखील नितांत आदर असून जे शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याची भाषा करत आहेत त्यांच्या उत्तराची मी वाट बघतोय अशी खोचक टीका देखील अविनाश जाधव यांनी खासदार राजन विचारे यांना लगावला आहे.
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे डॉक्टरांचा अपमान – भाजप
तसेच, एरवी एकमेकांचं तोंड न बघणारे ठाण्यातील शिवसेनेचे खासदार, आमदार, नामदार हे अविनाश जाधव यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. त्यामुळे जर, असेच जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र आले असते तर मनसे ला आंदोलन करण्याची व उपक्रम आखण्याची गरज भासली नसती, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

