Share

भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाची भीती निर्माण झाली असताना मुंबईतून आली दिलासा देणारी बातमी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि नागरिकांच्या हलगर्जीपणा यामुळे देशात स्थिती आणखी बिकट बनली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखाच्या पलिकडे गेला आहे. त्यातच आता भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केला आहे.

या सर्व प्रकारामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्गाची स्थिती अधिक गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुह संसर्गाच्या स्थितीत संसर्ग झालेल्या व्यक्तीला कुणाकडून आणि कोठे संसर्ग झाला याचा तपास करणे अशक्य होते आणि त्यामुळे संसर्गाचा वेगही वाढतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना मुंबईतील परिस्थितीत आता खूपच चांगली सुधारणा होत आहे.  मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या जरी १ लाखांहून अधिक असली तरी रुग्ण बरे होण्याचा दर हा खूपच चांगला आहे. टाईम्स नाऊ मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा मुंबईतील दर हा ७० टक्के इतका आहे. हा दर संपूर्ण देशातील रिकव्हरी रेटपेक्षा अधिक आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा ६३ टक्के इतका आहे. तर महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर ५५.०५ टक्के इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…भूमिपूजनाची तारीख ठरली,सुरु झाली जय्यत तयारी

छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला

शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स’

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!