Share

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कधी श्रेयासाठी काम करत नाही,हे काम ट्रोल्स करत असतात’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: धारावीतील कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यात सुरु झालेला श्रेयवाद हा काही संपत नसल्याचं चित्र सद्या दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले होते. यानंतर श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली.

धारावी कोरोनामुक्त झाल्यावरुन आधी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संघाच्या स्वयंसेवकामुळे धारावी कोरोनामुक्त झाली असा दावा केला होता. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीत संघाने काम केल्याचा दावा केला होता.

एकीकडे भाजप श्रेय घेऊन जात असल्याचं लक्षात येताच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील या श्रेयवादात उडी घेतली. ‘ज्या काळात भाजपाचे नेते मंडळी नमस्ते ट्रम्प करण्यात व्यस्थ होते, तेव्हा आमचे दुरदृष्टी असलेले नेते राहुल गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालल्यामुळेच हे शक्य झाले,’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आता आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी धारावीत मुख्य काम हे मुंबई पालिकेनंच केले आहे, असं म्हटलं आहे.न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल भाष्य केले. ‘धारावी ही कोरोनामुक्त झाली ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं. पण, मुंबई पालिकेनं उत्तम काम केल्यामुळे धारावीतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली. धारावीत मुख्य काम हे मुंबई पालिकेनं केले आहे’ असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर, धारावीत इतर स्वयंसेवी संस्थांनीही मदत केली, असंही ते सांगायला विसरले नाही. तसंच, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कधी श्रेयासाठी काम करत नाही. हे काम ट्रोल्स करत असतात. त्यांनी आधी ठरवायचं आहे की धारावी मॉडेलला अपयशी ठरवायचं की त्याच्या यशाचं श्रेय घ्यायचे’, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राज्यातील सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवला ‘लॉकडाउन’

पुण्यात आता ‘कोरोना किलर’ उपकरण, इंडोटेक कंपनीने केला विषाणूंपासून बचावाचा दावा

‘मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे,पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेऊ’

‘या’ काँग्रेस नेत्याची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!