Share

‘या’ काँग्रेस नेत्याची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Published On: 

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. आता या कोरोनाची एन्ट्री राजकारणात देखील झाली आहे. काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याने २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले असून तिथे १४ दिवस क्वारंटाइन राहणार आहेत.

कोरोनाची लागण झाल्याच्या एक आठवड्याआधी अशोक चव्हाण मुंबईहून नांदेडला गेले होते. मुंबईतून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. यावेळी त्यांनी आपली करोना चाचणीही करुन घेतली होती. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता संसर्ग झाल्याचं निषन्न झालं होतं.

अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाल्याने २४ मे रोजी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २५ मे रोजी अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं होतं. मुंबईत लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

दरम्यान, आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

पॅकेज म्हणजे अर्थसंकल्पात करावयाच्या घोषणा नव्हेत, अशोक चव्हाणांचा केंद्रावर निशाणा

राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल : पृथ्वीराज चव्हाण

विधानसभा अध्यक्ष व्हायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीच झालो असतो – पृथ्वीराज चव्हाण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!