Share

‘या’ राज्यातील सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवला ‘लॉकडाउन’

Published On: 

रांची – देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. याच पार्शवभूमीवर झारखंड सरकारने शुक्रवारी एक आदेश जारी केला असून राज्यातील लॉकडाउन 31 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहे. यापूर्वीच्या अटी व शर्ती या लॉकडाउनमध्ये कायम राहणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

अनेक राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन झारखंडसह ,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाउन वाढविण्यात आल्याची घोषणा केली आहे. झारखंडमध्ये यापूर्वी 25 जूनपासून कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी सूट देण्यात आली आहे. मात्र, या लॉकडाउनमध्ये बससेवा, सलून आणि सार्वजिनिक सोहळ्यांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्य सचिव सुखदेवसिंह यांच्या सहीने हा लॉकडाउन वाढविण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात ई- कॉमर्सवरील बंदी उठविण्यात आली आहे.

सरकारने यापूर्वी बंदी घातलेल्या आस्थापनांवर यापुढेही बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे, धार्मिक ठिकाणी सर्वसामान्य लोकं नेहमीप्रमाणे एकत्र येऊ शकणार नाहीत. नेहमीप्रमाणे पूजा होणार नाहीच. सामाजिक उपक्रम, राजकीय, खेळ, मनोरंजन, अॅकेडमिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसह यात्रांनाही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था, कोचिंग क्लासेस, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल हे सर्वकाही बंदच राहणार आहे.

केंद्र सरकारने लॉकडाउनसंदर्भात सर्व अधिकार राज्य सरकारला दिल्यानंतर, देशातील बहुतांश राज्यात अनलॉक फेजमध्ये लॉकडाउन सुरु आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार देशात 30 जूनपर्यंत लॉकडाउन असून काही अटी व शर्तीसंह सूट देण्यात आली आहे.

सलून आणि ब्युटी पार्लर चालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

इंधन दरवाढीचा भडका उडाला; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नगरमध्ये जोरदार आंदोलन

सलून दुकानदारांना पारंपरिक व्यवसाय सोडून आता मोल मजूरी करण्याची वेळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!