जयपूर-राजस्थान मध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सचिन पायलट यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या १८ जणांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे.
आपल्या पुढील वाटचालीवर बोलताना सचिन पायलट यांनी, आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल, असं म्हटलं आहे. मी अजूनही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असं देखील सचिन पायलट म्हणाले.
I’m not joining BJP: Sachin Pilot to ANI pic.twitter.com/DhbVJs2X4b
— ANI (@ANI) July 15, 2020
पायलट आणि समर्थकांचा गट यामुळे भाजपच्या गोटात सामील होणार असल्याचा कयासही आता लावला जात आहे. मात्र पायलट यांनी याबाबत खुलासा करत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं आता स्पष्ट केलं आहे. पायलट यांच्या निर्णयानं राजस्थानचं राजकारण एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहचलं आहे. पायलट व समर्थकांचा गट नवा पक्ष स्थापन करणार असल्याची शक्यताही आता वर्तविली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
बारामतीतही आता पुन्हा वाढवला लॉकडाऊन
अमित देशमुखांचा धडाका ; कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी घेतला मोठा निर्णय
खोटे खुलासे करून नागपूरकरांची दिशाभूल करु नका; महापौरांची मुंढेंवर घणाघाती टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

