Share

…तर आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल : WHOने दिला इशारा

Published On: 

🕒 1 min read

अंतरराष्ट्रीय : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. आज अनेक देश लॉकडाऊन काढत आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोनाची अजून एखादी लाट येण्याची शक्यता असल्याचे रायन यांनी म्हंटले आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने लॉकडाऊन उठवण्याची घाई करू नये नाहीतर आणखी परिणामांना सामोरे जावे लागेल. तर ज्या देशांनी लॉकडाऊन काढला आहे, अशा देशांनी आता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे रायन म्हणाले.

नेमकं रायन म्हणाले की, काही देशांमध्ये करोनाची प्रकरणं कमी होत असली तर मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथे ही संख्या वाढत आहे. सध्या जग करोनाच्या पहिल्या लाटेत असून कोणत्याही क्षणी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने ठाम राहणं गरजेचं आहे.

यन यांनी करोना टप्प्याटप्प्याने येत असल्याचा इशारा दिला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिका जिथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन करोनाची दुसरी लाट टाळता येईल.

करोना कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा वाढू शकतो. करोनाची प्रकरणं कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव आता कमी होत जाईल आणि आपल्याकडे दुसरी लाट येण्याआधी तयारीसाठी खूप वेळ आहे असा विचार करणं चुकीचं ठरेल. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एका महिन्यात तो पुन्हा वाढू शकतो, असे रायन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात दरमहा 1 हजार रुपये टाकावे : अर्थतज्ञ बॅनर्जी

महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील; राऊतांनी भाजपला दिला इशारा

काय म्हणता !… ‘ही’ राजकीय चर्चा झाली शरद पवार आणि राज्यपालांच्या भेटीमध्ये ?

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरकडे घरकाम करणाऱ्या दोघांना ‘कोरोना’ची लागण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!