मुंबई : देशात लॉकडाउन जारी करुनही करोना विषाणूचा फैलाव अद्याप थांबलेला नाही. देशात चौथा लॉकडाउन सुरु असून आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चिंतेची बाब म्हणजे चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन जण करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
करणच्या घरात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच करणने याविषयीची माहिती बीएमसीला दिली. त्यानंतर या दोन्ही व्यक्तींना करणच्या घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
करण जोहरने सोमवारी संध्याकाळी याविषयी अधिकृत माहिती जाहीर केली. तसेच आपले कुटुंब आणि घरातील बाकीचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असेही करणने सांगितले.
https://twitter.com/karanjohar/status/1264942040199999490?s=20
दरम्यान, आम्ही सर्वांनी स्वॅब टेस्ट केली. तिचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, मात्र खबरदारी म्हणून पुढील 14 दिवस आम्ही स्वत:ला होम क्वारंटाईन करत आहोत. अधिकाऱ्यांच्या आदेशांचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत” असंही तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास गुप्त चर्चा, बैठकीबाबत राऊतांकडून मोठा खुलासा…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यात बैठक, पुन्हा होणार राजकीय भूकंप?
योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियंका गांधी कडाडल्या, म्हणाल्या…
रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

