मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावर राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. ही भेट केवळ चहा पाण्यापुरती मर्यादित होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज्यपाल कोश्यारी यांना शरद पवार हे एकदाही भेटले नव्हते. त्यामुळे शरद पवार यांना कोश्यारी यांनी निमंत्रण धाडले. या विनंतीला मान देऊन पवार राज्यपालांच्या भेटीला आले, असे पटेल यांनी स्पष्टीकरण दिले.
मात्र पटेल यांच्या स्पष्टीकरणानंतरही राजकीय श्रोत्यांचं समाधान झाले नाही. कारण दोन राजकारणातले बडे नेते जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यात कोणतेही राजकीय संवाद होणार नाहीत यावर मात्र शंका व्यक्त केली जात होती. परंतु आता या भेटीमध्ये काय घडलं ? याची माहिती समोर आली आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार असे समजते की, राज्यपाल यांनी शरद पवार यांना मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करण्याचा सल्ला दिला. आपण अनुभवी नेते आहात, आपला अनुभव दांडगा आहे. आपण जरा या मंत्रिमंडळाला आणि सरकारला मार्गदर्शन करावे, असे कोश्यारी म्हणाले.
मात्र यावर शरद पवारांनी मिश्कीलपणे उत्तर देत मी कोणाच्याही कामात दखल देत नाही असे म्हणाले. जर एखाद्याला काही अडचण असेल तर मी नक्कीच मार्गदर्शन करतो, असे म्हणत पवारांनी चेंडू पुन्हा राज्यपालांच्या गोटात सरकवला.
दरम्यान गेले काही दिवस सरकार आणि राज्यपाल यांच्यात काहीशी कुरभूर सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकीय नेत्यांच्या राजभवनावरील भेटीगाठी वाढल्या आहेत. शरद पवार यांच्या आधी शिवसेना खा. संजय राऊत हे राज्यपालांच्या भेटीला गेले होते. ही भेट देखील सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
चित्रपट दिग्दर्शक करण जोहरकडे घरकाम करणाऱ्या दोघांना ‘कोरोना’ची लागण
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास गुप्त चर्चा, बैठकीबाबत राऊतांकडून मोठा खुलासा…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यात बैठक, पुन्हा होणार राजकीय भूकंप?
योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियंका गांधी कडाडल्या, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
