Share

सांगलीतील एक हजार १३६ शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र?

Published On: 

🕒 1 min read

सांगली : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील एक हजार ३४६ शेतक-यांना सहा कोटी ५२ लाख रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र या कर्जमाफी यादीत जिल्ह्यातील काही शेतकरी व सहकारी सोसायट्यांची नावे आल्याने काहीसा गोंधळ उडाला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक लाख ७१ हजार ६८७ शेतक-यांची माहिती कर्जमाफी यंत्रणेकडे सादर केलेली आहे. त्यातील एक हजार १३६ शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती घेता सांगली जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी अद्याप अपात्र शेतक-यांची कोणतीही यादी प्रसिध्द झालेली नाही. त्यामुळे या एक हजार १३६ शेतक-यांच्या अपात्रतेबाबतची माहिती चुकीची असल्याचे सांगितले. कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे व दाखल अर्जांच्या छाननीत घोळ झाल्यामुळेच ही कर्जमाफी प्रक्रिया काहीशी लांबल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दीपावलीच्या पहिल्या दिवशी सांगली जिल्ह्यातील २८ शेतक-यांना कर्जमाफी योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी या शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली होती. सांगली जिल्ह्यातील एक हजार ३४६ शेतक-यांसाठी सहा कोटी ५२ लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले असून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्तही झाले आहे. आता त्या अनुषंगाने शेतक-यांची यादी निश्‍चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!