Share

कॉंग्रेसकडून विधान परिषदेच्या उमेदवारी मिळवणारे राजेश राठोड आहेत तरी कोण ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी यासंदर्भातील पत्रक जाहीर केलं आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. राजेश राठोड यांना उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातील अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे.

कॉंग्रेसमधून विधानपरिषदेसाठी अनेक दिग्गज इच्छुक होते. नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा कॉंग्रेस मध्ये होती. मात्र कॉंग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत राजेश राठोड यांनी रिंगणात उतरवले आहे.

सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही, खैरे सत्तारांवर भडकले

विधान परिषदेचे माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे राजेश राठोड हे चिरंजीव आहेत. धोंडीराम राठोड देखील जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. राठोड कुटुंब हे काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते. राठोड यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळेच त्यांना विधान परिषदेचेची उमेदवारी देऊ केल्याचे बोलले जात आहे, अशी चर्चा सध्या सुरुवात सुरू आहे.

‘मध्यप्रदेशात जें घडलं ते महाराष्ट्रात घडू देणार नाही’ :- शरद पवार

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर काम केलेल्या राजेश राठोड यांच्याकडे सध्या काँग्रेसचे कोणतेही पद नाही. तरिही मंठा तालुक्यात जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे ते सचिव आहेत. या संस्थेअंतर्गत विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय सुरू आहेत. शिक्षण संस्था आणि बंजारा समाजाच्या माध्यमातून त्यांचा मंठा आणि परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजाची दांडगा जनसंपर्क आहे. जालना जिल्हा परिषदेचे माझी सदस्य तथा समाज कल्याण विभागाचे माजी सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

#corona : सचिनने पुन्हा केला पुढे मदतीचा हात, चार हजार गरजू लोकांना केली मदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!