🕒 1 min read
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. सचिनने अडचणीचा सामना करत असलेल्या चार हजार गरजू लोकांना मदत केली आहे. मात्र मदतीचा खुलासा करणे त्याने टाळले आहे.
सध्या लॉकडाऊन सुरू आहे, आणि या चार हजार जणांना अडचण येत होती पण, अशा परिस्थितीत सचिन त्यांच्या मदतीला धावून आला. विशेष म्हणजे यामध्ये महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. सचिनने हाय फाईव्ह या संस्थेच्या माध्यमातून ही मदत केली आहे.
सचिनने हाय फाईव्ह संस्थेला त्यांनी केलेल्या कामाकरता ट्विट करून शुभेच्छा दिल्या. तर, सचिनला टॅग करत केलेल्या मदतीबाबत ट्विट करून आभार व्यक्त केले. सचिन नेहमीच लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे आल्याचे आपण पाहिले आहे.
दरम्यान तेंडुलकरने यापूर्वी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता २५-२५ लाख रुपये मदत केली आहे. तर सुरेश रैना, विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी, अजिंक्य राहणे, रोहित शर्मा या खेळाडूनी आर्थिक स्वरुपात मदत केली आहे. तर इरफान पठाण, सौरव गांगुली, युसुफ पठाण या खेळाडूनी गरजू लोकांसाठी अन्नदान करत मदतीचे हात पुढे केले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
