🕒 1 min read
मुंबई : महानगरपालिकेचे मावळते आयुक्त प्रवीण परदेशी यांची अपर मुख्य सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर राज्य शासनाने नियुक्ती केली असून त्यांच्या जागी इकबाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार चहल यांनी आज (दिनांक ८ मे २०२०) सायंकाळी महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे प्रधान सचिव (जलसंपदा) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.
पालकांना दिलासा ! शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही : राज्य सरकार
२० जानेवारी १९६६ रोजी जन्मलेल्या चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. इलेक्ट्रॉनिक्स एण्ड इलेक्ट्रीकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्ये महाराष्ट्र तुकडीत प्रवेश केला.
‘त्या’ धक्कादायक व्हिडीओनंतर, सायन रुग्णालयातील डीनला हटवले
भारतीय प्रशासकीय सेवेचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चहल यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना केंद्रीय गृह खात्याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये सोपवली होती.
घाबरू नका ! कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तर बरे होण्याचे प्रमाणही 30 टक्क्यांवर
गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्प, ग्रामविकास, दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांमध्ये भरीव योगदान दिलेल्या चहल यांनी जलसंपदा खात्यामध्ये केलेल्या कामगिरी आधारे जानेवारी २०१८ मध्ये महाराष्ट्राला उत्कृष्ट जलसिंचन व्यवस्थापनाचा केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या नेतृत्वात ‘सेतू’ केंद्राच्या यशस्वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स पुरस्कार २००२ देखील मिळाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार देखील मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारे धावपटू म्हणूनदेखील त्यांची वेगळी ओळख आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
