Share

‘त्या’ धक्कादायक व्हिडीओनंतर, सायन रुग्णालयातील डीनला हटवले

Published On: 

मुंबई : सायन रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या शेजारीचं दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच मुंबई महापालिकेवर सगळ्यांनी टीकेची झोड उठवली होती. आता प्रशासनाकडून कारवाई दाखल सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी केली आहे. तर आता डॉ. रमेश भारमल हे सायन रुग्णालयातील नवे अधिष्ठाता असणार आहे.

पालकांना दिलासा ! शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही : राज्य सरकार

मुंबई महापालिका आयुक्तांनी डॉ. रमेश भारमल यांनी सायन रुग्णालयाच्या संचालक आणि अधिष्ठातापदी नेमणुकीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार डॉ. रमेश भारमल हे 24 तास सायन रुग्णालयात राहणार आहेत. डॉ. भारमल यांच्यावर कुपर रुग्णालय आणि एच. बी. टी मेडिकल कॉलेज यांच्यावर लक्ष ठेवण्याची देखील जबाबदारी असणार आहे.

घाबरू नका ! कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तर बरे होण्याचे प्रमाणही 30 टक्क्यांवर

दरम्यान मुंबईतील सायन रुग्णालयातील धक्कादायक वृत्त समोर आले होते. मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ हा व्हायरल झाला होता. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फॅॅक्ट चेक केलं. त्यानंतर हा व्हिडीओ खरा असल्याचं सांगत या घटनेची तक्रार भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) करण्यात आली होती.

गुजरात राज्य सरकारची त्यांच्याच मजुरांना राज्यात घेण्यास नकार घंटा, थोरातांचा गंभीर आरोप

आमदार नितेश राणे आणि मिलिंद देवरा यांनी बुधवारी हा व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!