टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंबीय सोडत नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना शिवसेनेने जागा दिली नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, 30 डिसेंबर रोजी ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या दिवशी 35 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडाळात जागा मिळालेली नाही. याच मुद्द्याचा धागा पकडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर टीका केली.
‘मातोश्री’ने रामदास कदम यांना त्यांची लायकी दाखवली. मातोश्री’वर पदोन्नतीसाठी फक्त दोन गोष्टी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे नारायण राणे यांच्यावर टीका आणि दुसरी म्हणजे गांधीजींचे दर्शन. गांधीजींचे दर्शन म्हणजे पैसा. मातोश्रीवर जो पैसे पाठवेल त्याची पदोन्नती होते, अशी टीका राणे यांनी केली आहे.
शिवसेनेचे नेते दीपक केसकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यामुळे शिवसेनेने त्यांना मोठे केले. तर उदय सामंत ठेकेदार आहेत. ते ‘मातोश्री’वर पैसे पाठवतात. त्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिपद मिळाले, असा दावाही निलेश राणे यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

