Share

‘बरनॉल’ जपून ठेवा सहा महिन्यांनी याची गरज लागले, भाजपचा आदित्य ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आ. आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपचं दुःख समजू शकतो, पण बरनॉल द्या असं म्हणणार नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टोला लगावला होता. यावर आता भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी यावर आदित्य ठाकरेंना उत्तर दिल आहे. बरनॉल जपून ठेवा याची गरज तुम्हालाच लागले, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. त्यामुळे बरनॉल जपून ठेवा, सहा महिन्यानंतर तुम्हालाच त्याची गरज लागेल. कारण जी विचारधारा त्यांच्यासोबत आहे, ती कधी आग लावेल हे कळणार नाही, असे लाढ म्हणाले. तर र्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार हा मुद्दाच मागे राहिला. सर्वसामान्य शिवसैनिक हा सर्वसामान्यच राहिला. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील लोकंच आमदार आणि मुख्यमंत्री व्हायला लागलेत. त्यांना बोलण्याचा अधिकारच राहिला नाही, असा टोला आदित्य ठाकरेंना प्रसाद लाड यांनी लगावला.

दरम्यान सत्ता गेल्याचं दु:ख समजू शकतो, आता त्यांनी ट्वीट करत राहावं, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीसांच्या ट्वीटला उत्तर दिलं होत. ‘बरनॉल द्या’ असं मी सांगणार नाही, असा खोचक टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला होता. तसेच अमृता फडणवीस यांनी ट्विट करून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. यावरून सेना-भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेचं पेटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!