Share

पक्ष माझ्या बापाचा, मी भाजप सोडणार नाही ; पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गोपीनाथ गडावर होणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्यासाठी राज्यातील अनेक राजकीय मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री प्रकाश मेहता, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, महादेव जानकर, आदी नेते उपस्थित होते. मी बेईमान होणार नाही. मी पक्ष सोडणार नाही. हा पक्ष माझ्या बापाचा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मी एक-एक आमदार निवडून यावा यासाठी प्रचार करत होते. मग मी का बंड करणार ? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पळत होते. मग मी बंड करणार असल्याची पुडी कोणी सोडली. मी कोणाकडेही काही मागणी केली नाही. पंकजा मुंडे पक्ष सोडणार हे कोणी सांगितलं ? पक्षाने यावर उत्तर दिलं पाहिजे. पंकजा मुंडेंनी पदासाठी दबाव आणलाय अशा वावड्या उठवण्यात आल्या. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. पक्ष हा एका माणसाचा नसतो. ती एक चिरंतर प्रक्रिया आहे. मुंडे साहेबांनी आज मूठभर असलेला पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. पण आता जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला पक्ष मुठभर माणसांपुरता ठेऊ नका, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.

भाजप हा माझा पक्ष आहे. हा माझ्या बापाचा पक्ष आहे. त्यामुळे मी पक्ष सोडणार नाही. सत्ता नाही म्हणून खचून जाणार नाही. कार्यकर्त्यांना बळ दिल पाहिजे. अजिबात हरायचं नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. मी संघर्ष करून काम करणार आणि पक्षाला पुन्हा बळ देणार. 40 – 50 वर्ष खपलेल्या माणसांना वाऱ्यावर सोडणार नाही. खडसे , डांगे यांचा पक्षपुन्हा निर्माण करणार आहे, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी बोल्यून दाखवला. मी मशाल घेऊन राज्यभर दौरा काढणार आहे. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण करणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सिंचनासाठी मी 27 जानेवारीला उपोषण करणार, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

खोट्या बातम्या कोठून येतात. मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. मी पक्ष सोडणार नाही. मला ठेवायचं का नाही हे पक्षाने ठरवावं . सत्तेत बंधन असतात. आता तर मी मुक्त आहे. त्यामुळे सर्वांसाठी काम करणार. मी आधी परळीची होते. आता तर संपूर्ण राज्याची आहे. मी जनतेसाठी राजकारणात आहे., असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मी बेईमान होणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान दिवंगत भाजपनेते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या १२ डिसेंबरच्या जयंती कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप नेते बबनराव लोणीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,आमच्या आयुष्यात गोपीनाथ मुंडे यांचे मोठे स्थान आहे. आज मुंडे साहेबांमुळेच जो आज सरपंच होत नव्हता त्याला आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आज मुंडे साहेबांमुळेचं आम्ही आमदार आणि मंत्री झालो. त्यामुळे आता अपयश आलं असल तरी पंकजा मुंडे या 50 हजार मतांनी निवडून येणार आहात, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1205061019573207040?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205056821070721025?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205056794852126720?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!