🕒 1 min read
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी साडे बारा वाजता प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या 9व्या हप्त्याचं वाटप करण्यात आलं. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमातून नऊ कोटी 75 लाखांहून अधिक लाभार्थीं शेतकरी कुटुंबाना 19 हजार 500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेची घोषणा २०१९च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मदतनिधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. यानिमित्ताने आज मोदींनी लाभार्थी शेतकाऱ्यांशी मोदी यांनी संवाद साधला.
आगामी 25 वर्षात म्हणजेच 2047 या वर्षांपर्यंत शेती, शेतकरी आणि गावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या देशाला एक वेगळ्या पातळीवर नेणार असल्याचं पंतप्रधान देशवासीयांशी बोलतांना म्हणाले. आत्तापर्यंतची सर्वात मोठी शेत मालाची खरेदी चालू हंगामात सरकारनं केली आहे. आपण डाळ आणि खाद्य तेल उत्पादनातही आत्मनिर्भर होणा गरजेचं असून आपला शेतकरी हे संधी करू शकतो असा विश्वास मोदी यानी व्यक्त केला.
कृषी निर्यातीत पहिल्यांदाच आपलं देश जगातल्या पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना जास्त ताकद देण्याचा आणि स्वतंत्र करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असून देशातल्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपलं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलतांना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी; मनसेच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरं सरकार देणार काय ?
- सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते ?
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- ‘मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत,तर राज्यातील भाजपनेते मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
