🕒 1 min read
नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पक्षातील काही नेते राहुल गांधी यांच्या नावाचा आग्रह धार आहेत तर काही नेते त्यांना बाजूला करावे अश्या बाजूचे आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्ष आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांना पुत्र मोह सोडावा लागेल, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा मोह टाळून काँग्रेस पक्षाला वाचवले होते. मात्र, आज त्याहूनही जास्त महत्त्वाची वेळ असून सोनिया गांधी यांनी पुत्र मोह बाजुला सारून लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे तिवारी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी हे उदासीन नेते आहेत. ते स्वत:च्या पक्षातील लोकांना प्रोत्साहित करू शकत नाहीत मग जनतेची गोष्ट तर सोडाच. त्यांच्या पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष तोंडघशी पडत असल्याचे शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी या सर्व मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. माझ्यासहित पक्षातील ९९.९ टक्के लोकांना राहुल गांधी हे अध्यक्ष व्हावेत असे वाटते परंतु शेवटी निर्णय राहुल गांधी यांनाच घायचा आहे असं ते म्हणाले.एनडीटीव्ही ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मंथन से ही “अमृत” निकलता है लेकिन किसी को “विष पान” भी करना पड़ता है,कांग्रेस को बचाना है तो प्रियंका गांधी को अध्यक्ष बनाना चाहिये और कोई “रास्ता”
नहीं है,अन्यथा जन-गण-मन गाने के लिये तैयार हो जाओ.— Acharya Pramod (@AcharyaPramodk) December 19, 2020
दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णन यांनी देखील या संदर्भात एक भाकीत केले आहे. मंथनातून अमृत निघते मात्र कुणाला तरी विषपान करावेच लागते. कॉंग्रेसला वाचायचं असेल तर प्रियांका गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवा अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- नव्या कृषी कायद्यांबाबत बिहारमध्ये कोणतीही अडचण नाही : नितीशकुमार
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
