औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी तब्बल ९३. ९० टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक फुलंब्री, सोयगाव व पैठण तालुक्यात १०० टक्के मतदान झाले आहे. तर औरंगाबादच्या मतदान क्रमांक १ मध्ये सर्वात कमी ६०. ७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी होणार आहे. यात विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. सर्वांचे डोळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसेच भाजपच्या पॅनलवर लागून आहेत.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रियेंतर्गत रविवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील २१ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील पैठण,खुलताबाद मतदारसंघातील उमेदवार बिनविरोध आल्याने तर वैयक्तिक मतदारसंघातील जागेसाठी एकही अर्ज न आल्याने उर्वरित १८ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया घेतली. एकूण ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. औरंगाबादेतील दोन तर प्रत्येक तालुक्यात १ अशा एकूण १० मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली. निवडणुकीसाठी एकूण ९३. ९० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १११४ मतदार आहेत. यातील १०४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. पहिल्या दोन तासात ८ ते १० दरम्यान जिल्ह्यात ३२१ मतदारांनी मतदान केले. तर १० ते १२ या या वेळेत मतदानाला गती आली. दरम्यान ४५९ मतदान झाले. यानंतर हा जोर ओसरलेला दिसला. दुपारी १२ ते २ या वेळेत २२३ तर तर २ ते ४ या वेळेत ४३ मतदारांनी मतदान केले. दुपारी साडेतीन ते ४ या वेळेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानासाठी राखीव ठेवण्यात आला होता. औरंगाबादेत ५ कोरोना रुग्णांनी मतदान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या रुग्णांनी पीपीई किट घालून आणले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार
- अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शरद पवारांचं भाष्य !
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- “माझ्या शरीरात राजपुतांचं रक्त आहे ; मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
