Share

गणपती विसर्जनाला गालबोट, राज्यात विविध ठिकाणी ८ जणांचा मृत्यू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या दहा दिवसांपासून घराघरामध्ये उत्साह निर्माण करणारे बाप्पा त्याच्या गावी गेले. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर ते परत गेले आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यात सगळीकडे विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी पाहायला मिळाली.

राज्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला अनेक ठिकाणी गालगोट लागले आहे. राज्यातील विविध घटनांमध्ये ८ गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईत जूहू चौपाटीवर कृष्णा राजभर हा ९ वर्षांचा मुलगा हरवला आहे. तर पुण्यात वृदेश्वर घाटाजवळ एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. तर नांदेडमध्ये शशिकांत कोडगीरवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

तसेच अहमदनगर जिल्यातील शेवगाव येथे अनिल वाल्हेकर या मुलाचा असे मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील मालखे़डजवळील कृष्णा नदीत मूर्तीचे विसर्जन करताना अनिरुद्ध संजय मोहिते या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. चेतन विजय शिंदे याचा कोयना नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, वर्धा जिल्ह्यातही गुणवंत गाखरे या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्य झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा खाडीपात्रात पडल्याने मृत्यू झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!