🕒 1 min read
मुंबई : श्रीमंतांच्या महागड्या कार्समध्ये आठ एअरबॅग्स उपलब्ध करुन देता, मात्र सर्वसामान्यांच्या कार्समध्ये केवळ दोनच एअरबॅग्स? असा सवाल कार उत्पादक कंपन्यांना विचारत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांच्या सर्व वेरिएंट आणि सेगमेंटमध्ये ६ एअरबॅग कंपलसरी दिल्या जाव्यात, असे अवाहन नितीन गडकरी यांनी सर्व वाहन निर्मात्या कंपन्यांना केले आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना नितीन गडकरी म्हणाले, लोअर मीडल क्लास नागरिक लहान इकोनॉमिक कार विकत घेतात. या कारमध्ये पुरेशा एअरबॅग्स नसल्यास अपघातात त्यांचा मृत्यू ओढावू शकतो. सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लहान कार्समध्ये किमान ६ एअरबॅग्स ठेवण्याचे अवाहन आम्ही वाहन निर्मात्या कंपन्यांना केले आहे. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिक सुरक्षित प्रवास करु शकतील.
वाहन निर्मात्या कंपन्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून यामुळे लहान इकोनॉमिक कारच्या किमतीत वाढ करावी लागणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. या कारमधील एअरबॅग्सची संखा वाढवल्यास कारची किंमत ३० ते ४० हजार रुपयांनी वाढणार असल्याचे सांगितले. यामुळे भविष्यात लहान कार जास्त पैसे देऊन खरेदी कराव्या लागणार आहेत, असे या वाहन निर्मात्या कंपन्यांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘थलायवी’ चित्रपटासाठी हिमाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून कंगनाचे कौतुक
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
