Share

औरंगाबादेतील काही भाग पुन्हा होणार कंटेनमेंट झोन

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेल्या केंद्रीय समितीने शहरात कोरोना रूग्ण वाढत असलेल्या वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून सील करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने आता कार्यवाही सुरू केली आहे. आगामी दोन दिवसांमध्ये शहरातील कोरोना रूग्ण वाढत असलेल्या वसाहतींचे सर्वेक्षण करून त्याचे मॅपिंग केले जाणार आहे.

सर्वेक्षणानंतर ज्या ठिकाणी अधिक गतीने रूग्ण वाढत आहेत, अशा वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणार आहे. पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी गुरूवारी (दि.११) ही माहिती दिली.

बुधवारी अत्यावश्यक सेवा संचालक तथा केंद्रीय पथकप्रमुख डॉ. रविंद्रण यांच्या पथकाने औरंगाबादचा आढावा घेऊन गतवर्षीप्रमाणे सुरूवातीच्या काळात रूग्ण वाढत असताना नियंत्रणासाठी ज्या प्रणालीचा वापर केला, तिच प्रणाली आता पुन्हा सुरू करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.

यात प्रामुख्याने कोरोना रूग्ण वाढत असलेल्या वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करून त्या सील कराव्यात, कोरोना रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचणी करून पॉझिटिव्ह आलेल्यांना उपचार देण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही सूत्री वापरण्याची सूचना केली. त्यानुसार पालिकेने कार्यवाही सुरू केले असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार कोरोना रूग्ण वाढत असलेल्या वसाहतींचे आगामी दोन दिवसांत पालिकेचे मेडिकल ऑफिसर, त्या त्या भागातील प्रभाग अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्याकरवी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर त्याचे मॅपिंग तयार करून अधिक रूग्ण वाढत असलेल्या वसाहती कन्टेनमेंट झोन घोषित करून सील केल्या जातील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!