Share

भूमिपुत्रांना खासगी नोकरीत ७५ टक्के आरक्षण; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय

Published On: 

रांची: हरियाणापाठोपाठ आता झारखंडमध्येही भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर आज कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. झारखंड विधानसभा अधिवेशनात त्याबाबतचं विधेयक मांडण्यात येणार असल्याचं हेमंत सोरेन सरकारने स्पष्ट केलं आहे.

हेमंत सोरेन सरकारने आज कॅबिनेटमध्ये तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचा आणि खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३० हजार रुपये पगार असलेल्या पदांसाठीच खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यात येणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नवीन व प्रभावी सूत्रानुसार राज्यात पाऊस पडणार आहे. सरकारने यासाठी ठोस व्यवस्था सुरू केली आहे. त्यानंतर २ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दुमका येथे सीएम हेमंत सोरेन यांनी आपल्या भाषणात खासगी क्षेत्रातील ७५ टक्के रोजगार स्थानिक लोकांना देण्याचे आश्वासन दिले होते.

गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजीच हरियाणाच्या विधानसभेत भूमिपुत्रांना नोकरीत ७५ टक्के आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं होतं. हरियाणात तरुणांना खासगी क्षेत्रात ७५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या विधेयकाला राज्यपालांनीही सहमती दर्शवली आहे. याबाबतचं नोटिफिकेशन लवकरच काढल जाईल आणि विधेयक पुढे पाठवल जाईल, असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं होतं. तर खासगी क्षेत्रात ७५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्यात आल्याने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे, आज राज्यासाठी आनंदाचा दिवस आहे, असं उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!