Share

गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये या साठी ग्रामस्थांनी दक्ष राहावे – अमित देशमुख

Published On: 

लातूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट अभुतपुर्व आहे, त्या पासून आपल्या गावचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी दक्ष रहावे, गावात स्वंयशीस्त पाळावी, कोरोना विरोधी पथकाच्या माध्यमातून मार्गदर्शन सुचनांचे नियमन करावे, गृहविलगीकरण शास्त्रीय पध्दतीने राबवावे, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना केले आहे.

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातुन शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहर विधानसभा मतदार संघातील २७ गावचे सरपंच व सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, तसेच ग्रामसेवक यांच्याशी व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सुरुवातीला  प्रत्येक गावच्या सरपंचाकडून गावातील सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाची परिस्थिती, एकुण रूग्ण, या रुग्णांवर होत असलेले उपचार, प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजना, या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना येत असलेल्या अडचणी या संदर्भात माहिती जाणून घेतली.

सर्व गावातील परिस्थितीची माहिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक गावात लसीकरण मोहिम राबवावी, गृहविलगीकरणातील रूग्णांना नियमीत औषध पुरवठा करावा, आवश्यकतेनुसार गावात संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारावे, गावागावात पोलीस पेट्रोलींग वाढवावी, गावातील दुकानदार व विक्रेत्यांची कोरोना तपासणी करून घ्यावी, बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांची कोरोना तपासणी करावी, लोकप्रबोधनासाठी मोहिम राबवावी, मास्क, सॅनीटयझर वापराची सक्ती करावी आदी प्रकारच्या सुचनाही गावचे प्रमुख व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या बैठकी दरम्यान अमित देशमुख यांनी दिल्या.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!