पुणे – पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती सुधारवयाची असेल, तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसले पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नगरसेविका मंजुषा खर्डेकर यांच्या प्रयत्नातून एसएनडीटी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार यांच्यावर कामाचा ताण येत असेल तर त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला दुसरा पालकमंत्री देऊन मुंबईतून राज्याचा कारभार पाहावा, असं आवाहन पाटील यांनी शुक्रवारी केलं.
अजित पवार पुणेकरांना उपलब्ध नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला अजित पवार यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज उत्तर दिलंय. अजित पवारांनी आपल्या दैनंदिन कामकाजाचा लेखाजोखाच पत्रकातून मांडलाय. तसंच, माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासण्याची गरज आहे, अशी तोफही डागलीय.
दरम्यान, पवार यांनी केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकते. पण मी चॅलेंज केले होते की, अजित पवारांना फोन लावून द्या, कारण ते गायबच होते. २४ तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असा वाटतं की, त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा. आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. पण एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यातील तिन्ही ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट; पाईपलाईनची संपूर्ण तपासणी
- घाटीत आज अठरा रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी!
- लातुरात ऑक्सिजनचा तुटवडा; ऑक्सिजनचा अयोग्य वापर टाळा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
- फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई
- हृदयद्रावक : कोरोनाला हरवून आज मिळणार होता डिस्चार्ज अचानक आग लागली अन् होत्याचं नव्हतं झालं

