🕒 1 min read
औरंगाबाद : महापालिकेला राज्य सरकारने कोरोना संसर्गाशी लढा देण्यासाठी सीएसआर फंडातून २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून दोन कार्डियाक आणि सहा साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. या आठ रुग्णवाहिकांचे लोकार्पण शुक्रवारी (दि.१७) मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मैदानावर झाले. उद्या शनिवारपासून या रुग्णवाहिका आता शहराच्या आरोग्य सेवेत पूर्ण क्षमतेने दाखल होणार आहेत.
औरंगाबाद पालिकेला कोरोना उपाययोजनांसाठी सीएसआर फंडातून निधी मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेत राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून सीएसआर निधीतून २ कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला होता. पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या निधीतून दोन कार्डियाक आणि सहा साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेत त्यानुसार खरेदी करण्यात आली. या नवीन खरेदी केलेल्या रुग्णवाहिका पालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका तयार करून घेतल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जि.प. नवीन इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी करण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य सरकारच्या जेमपोर्टलद्वारे पालिकेच्या यांत्रिकी विभागाकरवी रुग्णवाहिका खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. सहा साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिका ७८ लाख ७५ हजार रुपयात एसएमएल इसुझु कंपनीकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच दोन कार्डीयाक रुग्णवाहिका ५८ लाख ४३ हजार रुपयाच्या असून त्याही एसएमएल इसुझु कंपनीकडून घेतल्या आहेत. या आठ रुग्णवाहिकांसाठी १ कोटी ३७ लाख १८ हजार रुपयाचा खर्च आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- मुंबई ATS अॅक्शन मोडमध्ये; बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग करणाऱ्या ‘मुन्ना भाई’ला मुंब्रातून अटक
- ओला ई-स्कूटरची दोन दिवसात तब्बल ११०० कोटींची विक्री
- पाकिस्तानी खेळाडूच्या ‘त्या’ ट्विटवर किवी क्रिकेटपटूचे चोख प्रत्युत्तर
- इव्हेंट खत्म; एकाच दिवशी अडीच कोटी लोकांच्या लसीकरणावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
