Share

संतापजनक ! पुण्याला पीएम केअर फंडातून मिळालेले तब्बल ५८ व्हेंटीलेटर्स खराब

Published On: 

पुणे : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर, पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

देशातील सर्वाधिक ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा अव्वल क्रमांक आहे. यासोबतच, दररोज कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्याला पीएम केअर फंडातून मिळालेले तब्बल ५८ व्हेंटीलेटर्स खराब निघाल्याची तक्रार ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत डॉ. मुरलीधर तांबे यांनी याबाबत तक्रार केली आहे. लसीकरणासह कोरोना प्रतिबंधक साहित्य पुरवण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याची टीका सध्या होत असतानाच ही माहिती समोर आल्याने आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बेड्स देखील शिल्लक नसतानाच ५८ व्हेंटिलेटर्स खराब असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला आहे. ‘पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत,’ अशी तक्रार डॉ. मुरलीधर तांबे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!