मुंबई : कोरोना रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्या संदर्भात सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्री देखील स्पष्ट संकेत देत आहे. दोन आठवड्यांचे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यात आधी सर्वसामान्यांना पॅकेज द्या आणि नंतरच लॉकडाऊन लावा असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे. इतकच नाही तर अनिल देशमुख प्रकरणावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केलीय.
लॉकडाऊनला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, आधी आर्थिक पॅकेज द्या, नंतरच लॉकडाऊनची घोषणा करा, असे विरोधी पक्षांनी स्पष्ट केले आहे. त्यातच लॉकडाऊन लावण्याआधीच या निर्णयावर टीका होण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री कोरोना पॅकेज देणार होते, ते द्या म्हणजे लोकांचे हाल होणार नाहीत, असे राम कदम यांनी म्हटले आहे. तसेच मनात येईल तेव्हा फक्त हे बंद, ते बंद असे लहरि महाशयाचे वसूलीचे धंदे आधी बंद करा, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
लॉकडाऊन, कोरोना लस आणि रेमडेसिविर इंजेक्शन या बाबत सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र, राज्यात लॉकडाऊन लागणार असेल तर हातावर पोट असलेल्या अनेकांना आधी राज्य सरकारच्या आर्थीक पॅकेजची आवश्यकता आहे. त्या बाबत निर्णय घेतल्यानंतरच लॉकडाऊनला होणारा विरोध काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सचिन वाझेचा सहकारी रियाजुद्दीन काजीला NIA ने केली अटक
- ‘भाजपा विकृत मानसिकतेचा पक्ष…भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका!’
- ‘बसस्थानकाच्या श्रेयासाठी धनंजय मुंडेंचा आटापिटा’
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

