उस्मानाबाद : कोरोनामुळे सध्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. पण लग्न समारंभाप्रमाणे नियम लावून जागरण-गोंधळ या धार्मिक विधीला राज्यभर परवानगी देण्याची मागणी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यात लग्न समारंभापूर्वी लग्नघरी कुलदैवतांचा जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आहे. लग्न समारंभास जे नियम कोरोना प्रतिबंधक काळात आहेत, त्याप्रमाणे नियम घालून जागरण-गोंधळ विधी करण्यास प्रशासनाने परवानगी देण्याची मागणी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जोपर्यंत जागरण गोंधळ विधीला परवानगी मिळत नाही, तोपर्यंत गोंधळी समाजाला अत्यावश्यक किराणा साहित्य पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. तुळजापूरचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझेचा सहकारी रियाजुद्दीन काजीला NIA ने केली अटक
- ‘भाजपा विकृत मानसिकतेचा पक्ष…भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका!’
- ‘बसस्थानकाच्या श्रेयासाठी धनंजय मुंडेंचा आटापिटा’
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

