Share

औरंगाबादमधील 55 हजार शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ

Published On: 

औरंगाबाद-जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर कल्याणकर यांनी दिलेल्या महितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे. यामध्ये १०० टक्के थकबाकीदार असणाऱ्या २३ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे शिवाय प्रोत्साहनपर योजनेतील ३२ हजार ३६० शेतकऱ्यांचा समावेश आहे, असंही कल्याणकर म्हणाले.

 

पुढे बोलताना कल्याणकर यांनी आकडेवारी जाहीर करताना म्हणाले की औरंगाबाद जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेत पात्र शेतकऱ्यांची ही रक्कम साधारणतः ४०७ कोटी इतकी आहे. कर्जमाफीचा लाभ दीड लाखाच्या आतील थकबाकीदार शेतकरी आणि नियमित फेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर योजना अशा दोन्ही माध्यमातून देण्यात आली आहे. २३ हजार शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. १०० टक्के लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची रक्कम ४८ कोटी आहे.

शनिवार आणि रविवारी सुद्धा सुरू होत्या बँका

कर्जमाफी साठी विलंब होत असल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती हिवाळी अधिवेशनाच्या आधी कर्जमाफीचा प्रश्न निकाली निघावा म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक शनिवार आणि रविवार या सुट्टी च्या दिवशी सुद्धा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!