🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुन्हा आज पत्रकार परिषद घेत काही या घोषणा केल्या आहेत. आज त्यांनी कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा यांनी केली आहे. कोळसा उद्योगात व्यावसायिक खाणकामाला प्रोत्साहन दिले जाणार असून, कोळशाच्या उत्खननासाठी पात्र कंपन्यांना गुंतवणूक करण्याची संधी दिली मिळणार असल्याचं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं आहे.
कोळश्याच्या व्यावसायिक उत्पादनावर भर दिला जाणार आहे. कोळशाद्वारे गॅसनिर्मितीला प्राधान्य दिलं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोळसा क्षेत्रातील सरकारचे एकाधिकार कमी केले जाणार असून कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना संधी दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
The investment of Rs. 50,000 crores is for the evacuation of enhanced CIL's (Coal India Limited) target of 1 billion tons of coal production by 2023-24 plus coal production from private blocks: FM https://t.co/u9ZR8leyUj
— ANI (@ANI) May 16, 2020
आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी चौथी पत्रकार परिषद घेतली. आज आठ क्षेत्रांसबंधीच्या घोषणा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोठे सुधार करण्याकडे मोदी सरकारचा कल आहे. गुंतवणूक करण्यासाठी परदेशांची भारताला पसंती मिळाली आहे. बँकिंग क्षेत्रातही मोठ्या सुधारणा करणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या घोषणा :
कोळसा क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी कमी होणार.
संरक्षण क्षेत्रातली विदेशी गुंतवणूक ४९ वरुन टक्के.
संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियावर जास्त भर.
काही शस्त्रांच्या आयातीवर निर्बंध लावले जाणार.
ऑर्डनन्स फॅक्टरींचं खासगीकरण होणार नाही.
६ विमानतळांचा पीपीपी तत्त्वावर विकास करणार.
करोनाविरुद्ध लढ्यात भारती विद्यापीठही सहभागी!
राज्यातील विद्यर्थ्याना दिलासा, अंतिम सोडून पदवीच्या अन्य परीक्षा रद्द
काळजी करू नका, पुणे विभागात अन्न-धान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
