Share

काळजी करू नका, पुणे विभागात अन्न-धान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 28 हजार 994 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 483 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 2 हजार 763 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 21 हजार 789 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 14 मे 2020 रोजी 100.37 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.69 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

बीड : पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या,आरोपींवर कठोर कारवाई करा – प्रकाश आंबेडकर

दरम्यान, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 95 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 13 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 164 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 10 हजार 876 स्थलांतरित मजूर असून 69 हजार 321 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती देखील म्हैसेकर यांनी दिली.

#Corona : पुणे जिल्ह्यात १७७ रुग्ण कोरोनामुक्त तर १४१ नवे रुग्ण ; एकूण रुग्णसंख्या ३ हजार ५६७ वर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!