Share

राज्यातील विद्यर्थ्याना दिलासा, अंतिम सोडून पदवीच्या अन्य परीक्षा रद्द

Published On: 

मुंबई : राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

उदय सामंत यांनी सांगितल्या प्रमाणे, BA हा तीन वर्षांचा कालावधी आहे त्यात सहा सेमीस्टर असतात. त्यातल्या सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार. बीकॉमचंही तसंच असणार आहे. जिथे ८ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टर होणार, १० सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेणार आहोत.

तसेच MA, एमकॉम आणि इतर २ वर्षांचा कोर्स आहेत चार सेमीस्टर आहेत तिथे चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. कालावधी सहा सेमिस्टरचा आहे. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश मिळणार, मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते ३१ जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाउनची स्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

विधान परिषदेवर भाजपकडून ‘या’ 4 नेत्यांना संधी, तर तावडे-मुंडे-खडसेंना डच्चू

करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख : मुख्यमंत्री

चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारने वाढला, मुंबईची परिस्थिती चिंताजनक !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!