महाराष्ट्र देशा टीम : सिम्बॉयोसिस हॉस्पिटल (लवळे) नंतर आज दि. १२ एप्रिल २०२० रोजी पुणे मनपा व भारती विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या करारांतर्गत मनपाच्या वतीने भारती विद्यापीठास पीपीई किट्स, N-95 मास्क , सॅनिटायझर्स व रुग्णांना औषधे दिली जाणार आहेत. भारती विद्यापीठात करोना संशयित रुग्ण व बाधित रुग्ण व्यवस्थापन, उपचार व मनुष्यबळ यांच्या मार्फत सेवा दिली जाणार आहे. रुग्णांवरील खर्च मनपाच्या वतीने शासनाच्या CGHS नुसार भारती विद्यापीठास देण्यात येणार आहे. पुणे मनपाच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी व भारती विद्यापीठाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता जगताप व मेडिकल डायरेक्टर डॉ.ललवाणी यांनी करारावर सह्या केल्या.
महापौर यांनी भारती विद्यापीठाने उचललेले हे पाऊल स्फूर्तिदायी असल्याचे सांगितले. तसेच आयुक्त यांनी विद्यापीठाचा हा निर्णय करोना विरुद्ध लढ्यातील उभारी देणारा असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ.अंजली साबणे उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

