नवी दिल्ली : आज आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्तानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला खासदारांनी आपले विचार मांडले. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात महिला खासदारांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या दरम्यान, महिला आरक्षणाचा विषय सभागृहात आला. महिलांना केवळ ३३ टक्के आरक्षण का दिलं जात आहे? महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सभागृहात केली.
“देशात २४ वर्षांपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. परंतु आता ते ३३ टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के केलं गेलं पाहिजे. जेव्हा देशातील महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे तर महिलांचं प्रतिनिधीत्वदेखील ५० टक्के असलं पाहिजे,” असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
“लॉकडाऊनदरम्याम महिलांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो डोमेस्टिक रूपापासून मानसिक रुपापर्यंत आहे. अशा परिस्थितीत या विषयांवर सभागृहात चर्चा होणं आवश्यक आहे. महिलांना त्यांचे अधिकार देणं आवश्यक आहे, ” असंही चतुर्वेदी म्हणाल्या. दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबद्दल सदनात भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; पेट्रोल, डीझेलचे दर कमी होणार का याकडे लक्ष
- लसीकरणाच्या दिवशीच आजीबाईंची शंभरी पूर्ण ; लसीकरण केंद्रातच साजरा केला वाढदिवस
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा “हा” व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
- ‘तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही तुम्ही थेट…’; राज ठाकरेंचा ‘स्त्रीशक्ती’ला मोलाचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

