Share

करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात

Published On: 

नाशिक – नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपये चोरीला गेल्यानंतर पोलीस पथकाने नोट प्रेसमध्ये पहाणी केली आहे. या प्रकरणी नोट प्रेसमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही चोरी झाली कशी असा प्रश्न विचारला जातोय. प्रेसमध्ये बाहेरील व्यक्तीस प्रवेश नाही, त्यामुळे प्रेसमधील अज्ञात कामगार, स्टाफ किंवा सुरक्षा रक्षकांपैकी कोणीतरी पैसे चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमधील संबंधित करन्सी नोट प्रेसमध्ये भारतीय चलनी नोटांची छापाई केली जाते. याठिकाणी वर्षासाठी दोन ते अडीच हजार दशलक्ष किमतीच्या नोटा छापल्या जातात. त्यामुळे या कारखान्याला अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर याचं कारखान्यात दिवसरात्र छापाई करून देशातील नागरिकांना नोटा पुरवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, आता याच मुद्रणालयात चोरीचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे मुद्रणालय व्यवस्थेत खळबळ उडाली आहे. छपाईच्या कारखान्यातून चलनी नोटा गायब झाल्यानं मागील काही काळापासून गोपनीयरीत्या विभागीय चौकशी सुरू होती. पण सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!