Share

सिल्लोड, गंगापूर, कन्नडला धावल्या ४८ बसेस; रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगारांनी गेल्या महिनाभरापासून संप पुकारला आहे. मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारत असून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड वैजापूर कन्नड गंगापूर या ठिकाणी एसटी धावत आहे. शनिवारी (दि.१८) ४८ बसच्या १५४ फेऱ्या झाल्या. यातून ३१४७ प्रवाशांनी प्रवास केला. त्याचप्रमाणे एसटी महामंडळ प्रशासनाने गेल्या तीन दिवसांत १६ संपकऱ्यांना शोकॉज नोटीस बजावल्या आहेत. वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे एसटी प्रशासनाने शोकॉज नोटीस देण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या तीन दिवसांच्या काळात १६ कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी (दि. १७) विविध मार्गावर औरंगाबाद विभागातील विविध आगारांतून, ४७ बस धावल्या. तर शनिवारी ४८ बस धावल्या. आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर ९ बसने अठरा फेऱ्या करण्यात आल्या. यात २९६ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर २ बसने ८ फेऱ्या केल्या.

तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ५ शिवशाही बसच्या ५ फेऱ्या, औरंगाबाद-पुणे मार्गावर १७ शिवशाही बसच्या १७ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ४ बसने १६ फेऱ्या करण्यात आल्या. गंगापूर-औरंगाबाद एका बसच्या २ फेऱ्या, गंगापूर-वैजापूर एका बसच्या २ फेऱ्या अशाप्रकारे एकुण ४८ बसने १५४ फेऱ्या केल्या असून ३१४७ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला आहे. आज एकही नवा कर्मचारी रुजू झालेला नाही तर कोणत्याही कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रशासनातर्फे करण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!