सिल्लोड : महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने सिल्लोड येथे गुरुवार ( दि. २९ ) रोजी तहसील कार्यालयात निराधार योजनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेसाठी २२० तर श्रावण बाळ योजनेसाठी २०५ अशा एकूण ४२५ पात्र संचिकांना मंजुरी देण्यात देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांनी दिली.
सरकारच्या नवीन निकषांप्रमाणे सरकारने निराधार योजनेच्या कमिटी ऐवजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची सदस्य म्हणून तर नायब तहसीलदार यांची सदस्य सचिव म्हणून शासकीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या संकटकाळात वयोवृद्ध व निराधारांना आधार देण्यासाठी शासनाने निर्देशित केले आहे. त्याप्रमाणे शासकीय कमिटीच्या माध्यमातून बैठक घेऊन पात्र निराधारांच्या संचिका त्वरित निकाली काढा अशा सूचना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ( दि.२९) शासकीय कमिटीच्या झालेल्या बैठकीत ऑनलाइन झालेल्या सर्व पात्र संचिका निकाली काढण्यात आल्या.
यात एकून ५८ संचिकांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना याबाबत माहिती देण्यात येणार असून संचिकेत त्रुटी असलेल्या नागरिकांनी त्रुटींची पूर्तता करावी जेणे करून येत्या बैठकीत पात्र संचिकाना मंजुरी देता येईल असे तहसीलदार राजपूत यांनी सांगितले. ज्यांच्या संचिका आवश्यक कागदपत्रे अभावी नामंजूर झाल्या आहेत त्यांनी सदरील पूर्तता करून द्यावी. यातील पात्र संचिका त्वरित निकाली काढण्यात येईल. निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या वयोवृद्ध व निराधार नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील महिलांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून लघुउद्योग सुरू करावे -चंद्रकांत खैरे
- इतर जिल्ह्यातून बीडमध्ये येणाऱ्या नागरिकांची होणार अँटिजेन टेस्टिंग !
- ‘माझ्याकडे शब्द नाही,’ मिराबाई यांचा हा फोटो पाहून आर माधवनने केले कौतुक
- ‘पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही’; फडणवीसांचा ठाकरेंना उपरोधिक टोला
- मागचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे लग्न घरातून रोख, दागिने लंपास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

