बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी उद्यापासूनच करावी असे निर्देश मुंडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.
बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व उपाययोजना तसेच लसीकरण आदींचा आज समग्र आढावा घेतला. नवीन ऑक्सिजन प्लांट उभारणीसह जिल्हा संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सुसज्ज होत आहे. परंतु सद्यस्थितीत बाधित आकडेवारी व पॉझिटिव्हीटी रेट नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. (1/5) @InfoBeed pic.twitter.com/qhrzBWaU7X
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 30, 2021
कोरोना आणि लसीकरणा बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे पालकमंत्रीमुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटले- प्रविण दरेकर यांचा आरोप
- ‘प्रत्येकवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी केली’, प्रियांकाकडून मेरीकोमचं कौतुक
- काही कठोर निर्णय घ्यावे लागणार अन्यथा ‘हे’ संकट संपणार नाही – उद्धव ठाकरे
- संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
- ‘ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील’


