Share

राज ठाकरेंनी सांगितला एसटी संपावर ‘हा’ उपाय

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते औरंगाबाद येथे असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या अनेक मुद्यांवर भाष्य केलं. तसेच राज्यभरात गाजत असणारे एसटी कामगारांचे आंदोलन यावर देखील राज ठाकरेंनी वक्तव्यं केलं आहे. तसेच यावर त्यांनी उपाय देखील सांगितला आहे.

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, एक लाख कर्मचारी एकदम सरकारच्या अंगावर आले तर काय करणार सरकार. चार चार महिने त्यांचे पगार होत नाहीत. ऐन दिवाळीत कर्चमाऱ्याच्या घरी पगार नाही झाले. बाकीच्यांचे पगार होतात. मग कर्मचाऱ्यांचे का नाहीत, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच या संस्थेतील भ्रष्टाचार थांबला तर निश्चितच ही संस्था पुढे येईल, असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर उपाय सांगताना राज ठाकरे म्हणाले, या संस्थेत होणार भ्रष्टाचार थांबला तर ही संस्था पुढे जाईल. या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील बोललो आहे. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी नेमली पाहिजे. या कंपनीच्या देखरेखीखाली सर्व कारभार चालेल. कर्मचाऱ्यांनीही हा विषय जास्त ताणू नये. पण कुणीही यात समजून घ्यायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही हात धुवून घ्यायचे ठरवले आहे, असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!