Share

‘अकोल्यात विश्वासाला तडा, पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये 4 जागा या भाजपला मिळाल्या आहेत. नागपूर आणि अकोला-वाशिम विधान परिषद मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. शिवसेनेने निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या निकालावर खदखद व्यक्त केली आहे.

अकोला विधान परिषद निवडणूक चुरशीची झाली. पण या निवडणुकीत आम्हाला आघाडीची पूर्ण मते मिळाली नाहीत. त्यामुळे विश्वासाला कुठे तरी तडा जात असून आता आघाडीतील तिन्ही पक्षांनी त्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिली आहे.

अकोला विधान परिषदेत आमच्याकडे आकडा नव्हता. पण आमचा उमेदवार तगडा होता. 3 वर्ष ते सलग निवडून आले आहेत. या निवडणुकीत आघाडीकडे एकूण 408 मते होती. भाजपची स्वत:ची 225 मते होती. वंचित आघाडी आणि इतरांची मिळून त्यांचाही आकडा 400वर गेला होता. म्हणजे दोन्ही पक्षाकडे समसमान मते होती. पण आमची 100 टक्के मते आम्हाला मिळायला हवी होती. ती मिळाली नाही. शिवसेनेची मते नगण्य आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते सर्वाधिक आहे. त्यामुळे कुठे तरी विश्वासाला तडा जात आहे. पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.

विश्वासाला तडा हा आघाडीतील सर्व पक्षांशी संदर्भात आहे. कुण्या एका पक्षाला दोष देत नाही. आम्हीही त्यावर विचार केला पाहिजे. हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. आमचा मतदारांवर विश्वास पाहिजे. इतरांची मते मळायला हवी होती. आमची शंभर टक्के मते मिळायला हवी होती. आमच्या तीन पक्षाची 100 टक्के मते मिळाली नाही याचा अर्थ विश्वासाला तडा जात आहे. कसा जात आहे याची माहिती आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देऊ. बाकीच्या पक्षप्रमुखांनीही त्यावर गंभीरपणे पाहावं, असेही अरविंद सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!