नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांची अर्धवट राहिलेली जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. मात्र यावेळी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राणेंना जनआशीर्वाद यात्रेवरून चांगलाच टोला लगावला आहे.
केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांनी शांतपणे मोदींनी सांगितल्याप्रकारे जनआशीर्वाद यात्रा काढली. तसेच देशातील ३६ मंत्र्यांनीही शहाण्यासारखी यात्रा काढली. पण एका अतिशहाण्याने यात्रा काढली ज्यातून फक्त सेनेची बुराई केली आहे. त्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या कामाचा कुठलाच प्रचार केलेला नाहीये. असे म्हणत त्यांनी राणेंवर टीका केली आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी भाजपला इशाराही दिला आहे. जेव्हापासून भाजप पक्षात नारायण राणे यांनी प्रवेश केला आहे. तेव्हापासून भाजप दहा फुट मागे जात आहे. एक दिवस असा येईल की, भाजप अर्ध्या फुटावर जाणार. भाजपाने हा इशारा समजून घ्यायला हवा. एक दिवस राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे तुम्ही यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा. अशी टीका राऊत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सप्टेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद; जाणून घ्या
- पुण्यातील खेळाडूंच्या सेवेत ‘पुण्यदशम’
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
