Share

अमरावती हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ३१५ जणांना अटक

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : कथीत त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावती जिल्ह्यात उमटले होते. रझा अकादमीने पुकारलेल्या बंद दरम्यान मोर्चा काढण्यात आला त्याला हिंसक वळन लागून जाळपोळीसह तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत ३१५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे.

यावेळी आरती सिंह म्हणाल्या, अमरावती शहरामधील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहे. अमरावतीमध्ये मागील आठवड्यात आसाममधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाने केलेल्या मोर्चांदरम्यान हिंसा झाली होती. यानंतर शहरामध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली. आता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह म्हणाल्या.

अमरावती शहरातील परिस्थिती सर्वसामान्य झाली असून जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. शहरामधील परिस्थिती पाहता सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे, अशी माहिती सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

अमरावती हिंसाचारदरम्यान झालेलं नुकसान, लूटमारीविरोधात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल केल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या ५७ गुन्ह्यांमध्ये ३१५ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!